बोनी कपूर यांच्या नोकराची करोना टेस्ट पोझिटिव्ह

फोटो साभार डीएनए

मुंबई मधील करोना संक्रमण आटोक्यात येणे अवघड बनत चालले असून बॉलीवूड कलाकारही यातून सुटलेले नाहीत. प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या घरी काम करणारया नोकराची करोना टेस्ट पोझिटिव्ह आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलविले गेल्याचे बोनी यांनीच मिडियाशी बोलताना सांगितले.

बोनी म्हणाले शनिवार पासून हा २३ वर्षीय नोकर आजारी होता. लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये बोनी यांचे निवासस्थान असून मुली जान्हवी आणि खुशी त्यांच्याबरोबर याच घरात राहतात. नोकर आजारी पडल्यामुळे त्याला प्रथम आयसोलेशन मध्ये ठेवले आणि त्याची करोना टेस्ट घेतली. ती पोझिटिव्ह आल्याबरोबर त्याची माहिती बीएमसी आणि सोसायटीला देण्यात आली. त्यानंतर या नोकराला बीएमसीने त्वरित क्वारंटाइन सेंटर मध्ये दाखल केले असेही बोनी म्हणाले.

बोनी कपूर, जान्हवी, खुशी आणि घरातील अन्य नोकरांच्या तब्येती उत्तम असल्याचे समजते. लॉक डाऊन लागू झाल्यापासून घरातील कोणीही घराबाहेर पडलेले नसल्याचे बोनी यांनी सांगितले. यापूर्वी बॉलीवूड मध्ये कणिका कपूर आणि निर्माते करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली करोना पोझिटिव्ह आढळल्या होत्या तसेच अभिनेता फ्रेडी दारूवाला याच्या वडिलांना करोना लागण झाली होती.

Leave a Comment