चीनचा दावा; लसीविना नवीन औषध करू शकते कोरोनावर मात

लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम जगभरात सुरू आहे. आता चीनच्या एका लॅबने या व्हायरसवरील औषध शोधल्याचा दावा केला आहे. चीनच्या प्रतिष्ठीत पेकिंग यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांद्वारे या औषधाचे परिक्षण केले जात आहे.

संशोधकांनुसार हे औषध कोरोनाग्रस्तांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी करते व काही कालावधीसाठी व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी शक्ती देखील देते. यूनिव्हर्सिटीच्या बिजिंग एडवांस्ड इनोव्हेशन सेंटर फॉर जियोनॉमिक्स विभागाचे संचालक सन्ने झी यांनी सांगितले की, या औषधांचे प्राण्यांवरील परिक्षण यशस्वी झाले आहे. एका संक्रमित उंदराच्या आत न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडी इजेक्ट केल्यानंतर 5 दिवसांनी व्हायरल लोड 2500 पर्यंत कमी झाला. याचा अर्थ हे औषध प्रभावी ठरले आहे.

हे औषध निष्क्रिय करणाऱ्या अँटीबॉडीचा उपयोग करते. जे मनुष्याच्या रोगप्रतिकार प्रणालीद्वारे निर्माण होते व पेशींना व्हायरसपासून संक्रमित होण्यापासून वाचवते. सायंटिफिक जर्नल सेलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, अँटीबॉडीचा उपयोग केल्याने आजारावरील संभावित उपचार शक्य आहे व रुग्ण बरे देखील लवकर होतात.

Leave a Comment