खरा दानशूर; अज्ञात व्यक्तीने फेडले 4 जणांचे 10 लाख रुपये कर्ज

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे, तर काहींना सर्व काही बंद असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कर्जाचे हफ्ते देखील फेडण्यास समस्या येत आहे. यातच मिझोरममध्ये एका अनोळखी व्यक्तीने चार जणांचे 10 लाख रुपयांचे कर्ज फेडल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे कर्ज फेडण्यास अडचण येत असल्याने या 4 जणांचे कर्ज अनोळखी व्यक्तीने फेडले आहे. यामध्ये 52 वर्षीय ब्रेन ड्युमरची समस्या महिला आणि उद्योग उभारण्यास अडचण येत असलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

महिलेने कोलकत्ता येथे आपल्या उपचारासाठी आइझोल येथील स्टेट बँक इंडियाच्या ब्रँचमधून 4 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र उपचारानंतर या विधवा महिलेला कर्ज फेडण्यास अवघड जात होते. त्यांनी सांगितले की, मला बँकेकडून फोन आला की एक व्यक्ती कर्ज फेडू इच्छित आहे व बँकेने या यादीत तुमच्या नावाचा समावेश केला आहे. याच प्रकारे अनोळखी दानशूराने मौना एल फनाई यांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी घेतलेले 2.5 लाखांचे कर्ज देखील फेडले.

आइझोल येथील या दानशूराने आपली ओळख अज्ञात ठेवली आहे. एसबीआयचे ब्रँच मॅनेजर शेर्ली वँचाँग म्हणाले की, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितले की या कठीण काळात त्यांना मदत करायची आहे. ते आमच्या बँकेचे ग्राहक आहेत. ज्या लोकांनी आपली जमीन तारण ठेऊन घेतले आहे व कर्ज फेडण्यास समस्या येत आहे, अशांची त्यांना मदत करायची आहे. यानंतर बँकेने 4 जणांची निवड केली व त्यानंतर दानशूर व्यक्तीने बँकेला 9,96,365 रुपये ऑनलाईन ट्रांसफर केले.

Leave a Comment