सरकारी बँकांनी अडीच महिन्यात दिली 6.45 लाख कोटींच्या कर्जांना मंजूरी – सीतारमन

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (पीएसबी) 1 मार्च ते 15 मे दरम्यान लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), कृषी आणि किरकोळ अशा विविध क्षेत्रांना 6.45 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या बँकांनी 8 मे पर्यंत 5.95 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला मंजूरी दिली होती. या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

सीतारमन यांनी ट्विट केले की, 1 मार्च ते 15 मे दरम्यान पीएसबीने 6.45 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला मंजूरी दिली. यात 54.96 लाख खाते एमएसएमई, कृषि, किरकोळ आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आहेत. 8 मे पर्यंत 5.95 लाख कोटींच्या कर्जाला मंजूरी देण्यात आली होती, त्यामुळे ही उल्लेखनीय वाढ आहे.

त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 20 मार्च ते 15 मे दरम्यान आपतकालीन कर्ज आणि खेळते भांडवल स्वरूपात 1.03 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला मंजूरी दिली.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच सार्वजनिक बँकांनी एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्षेत्रांना कर्ज देण्यास सुरूवात केली होती.

Leave a Comment