लॉकडाऊन : ई-पाससाठी सरकारच्या नवीन वेबसाईटवर असा करा अर्ज

देशभरात लॉकडाऊन चौथा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात सरकारने नियम शिथिल केले आहेत. सरकारने आता प्रवासाची परवानगी देण्यास पास प्रक्रियेसाठी नवीन वेबसाईट serviceonline.gov.in लाँच केली आहे. या वेबसाईटला नॅशनल इन्फर्मेंटिक्स सेंटरने तयार केले आहे. या वेबसाईटवर सध्या 17 राज्यांचे नागरिक ई-पाससाठी अर्ज करू शकतात.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास नागरिक या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. या वेबसाईटद्वारे ई-पास अर्जाचे स्टेट्स देखील तपासता येईल. विद्यार्थी, सर्व्हिस प्रोव्हाईडर, पर्यटक, भाविक, मेडिकल ट्रॅव्हल आणि लग्न अशा प्रकारातील लोक अर्ज करू शकतात. सोबतच प्रवासाच्या कारणाचे पुरावे देखील द्यावे लागणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया –

Image Credited – navbharattimes

सर्वात प्रथम वेबसाईट http://serviceonline.gov.in/epass/ वर गेल्यावर ‘Select State to Apply e-Pass’ या पर्यायावर जाऊन राज्य निवडावे.

Image Credited – navbharattimes

येथे तुम्हाला राज्यांद्वारे देण्यात येणारी सर्व ई-पास सेवा दिसेल. तुम्हाला ज्या सेवेसाठी अर्ज करायचा आहे, त्यावर क्लिक करावे.

Image Credited – navbharattimes

यानंतर राज्याच्या ई-पास पोर्टलवर रीडायरेक्ट होईल. येथे सर्व महत्त्वाची माहिती, कागदपत्रे अपलोड करावे व अर्ज सबमिट करावा. सबमिट केल्यानंतर तुम्ही अर्जाच्या रेफ्रेंस नंबरद्वारे अर्जाचे स्टेट्स तपासू शकता.

अर्जाचे स्टेट्स तपासण्यासाठी प्रक्रिया –

Image Credited – navbharattimes

http://serviceonline.gov.in/epass/ वेबसाईटवर गेल्यावर  ‘Track Your Application’ वर क्लिक करा.

Image Credited – navbharattimes

ड्रॉप डाऊन मेन्यूद्वारे राज्य निवडा.

Image Credited – navbharattimes

येथे ‘Through Application Reference Number’ पर्याय निवडा.

Image Credited – navbharattimes

यानंतर बॉक्समध्ये अर्जाचा रेफ्रेंस नंबर टाका. कॅप्चा भरून, ई-पासचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी सबमिट करा.

Image Credited – navbharattimes

जर तुमच्याकडे अर्जाचा रेफ्रेंस नंबर नसल्यास, ‘Through OTP/Application Details’ या पर्यायाद्वारे देखील स्टेट्स जाणून घेऊ शकता.

Leave a Comment