अ‍ॅपलची मदत न घेता एफबीआयने हॅक केला दहशतवाद्याचा आयफोन

अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने फ्लोरिडा येथील अमेरिकेच्या नौदलाच्या तळावर पेंसाकोला येथे गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्याचा आयफोन विना अ‍ॅपलच्या मदतीशिवाय उघडण्यात यश मिळवले आहे. हा हल्ला मागील वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. अमेरिकेचे अटॉर्नी जनरल विलियम हे याबाबत म्हणाले की, सौदी वायूदलाचे अधिकारी मोहम्मद अलशरामीने 6 डिसेंबरला प्लोरिडा येथील नौदलाच्या तळावर हल्ला केला होता. अलशरामनी यांचा अल कायदाशी संबंध असल्याचे सांगितले जाते. याबाबतचे वृत्त नईदुनियाने दिले आहे.

अलशरामीने आपल्या दोन आयफोन पैकी एका गोळी घालून नष्ट केला होता. एफबीआयने आयफोनला हॅक करण्यासाठी अ‍ॅपलकडे अनेकदा मदत मागितली होती, मात्र कंपनीने यास नकार दिला होता.

एफबीआयचे संचालक क्रिस रेले यांनी आयफोनला उघडण्याचे श्रेय संस्थेच्या तंत्रज्ञानाला दिले आहे. रिपोर्टनुसार एप्रिलमध्ये एफबीआयने ग्रेके तंत्रज्ञानावर 72,150 डॉलर खर्च केले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर आयफोनला हॅककरून त्यातील डाटा मिळविण्यासाठी केला जाईल. संस्थेने तंत्रज्ञानावर आतापर्यंत 10 लाख डॉलर खर्च केले असून, याच्या लायसन्ससाठी 15 ते 30 हजार डॉलर खर्च येतो.

Leave a Comment