कामगारांना रस्ते किंवा रेल्वे रुळावर चालत जाण्याची गरज भासणार याची राज्यांनी काळजी घ्यावी – केंद्र

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले कामगार पायी आपल्या घरी निघाले आहेत. या कामगारांची समस्या कमी करण्यासाठी केंद्राने राज्य सरकारांना सहकार्य करण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात कामगारांसाठी स्पेशल रेल्वे चालविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधण्यास सांगितले आहे.

याशिवाय त्यांना घरी जाताना ज्या ठिकाणी हे कामगार विश्रांती घेण्यासाठी थांबत आहे, त्या जागा निश्चित करण्यास सांगितले आहे. या जागा जिल्हा प्रशासन, एनजीओ यांच्या मदतीने ओळखण्यात याव्यात, असे भल्ला यांनी सांगितले आहे.

राज्यांनी या विश्रांतीच्या ठिकाणांना सॅनिटायझ करणे व कामगारांच्या जेवण व आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही कामगारांना रस्ते किंवा रेल्वे रुळावरून चालत जाण्याची गरज भासणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने व राज्यांनी घ्यावी, असे भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment