या पदार्थांचा आहारात समावेश करून वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. तुम्ही देखील आहारात काही पदार्थांचे सेवन करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. या पदार्थांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – navbharattimes

लाल ढोबळी मिरची –

लाल ढोबळी मिरची तुम्हाला बाजारात सहज मिळू शकते. यात अनेक प्रकारचे पोषकतत्व आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. सलाड किंवा भाजी बनवून देखील याचा आहारात समावेश करू शकता.

आंबट फळे –

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात आंबट फळांचा समावेश करा. आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन-सीचे प्रमाण अधिक असते. व्हिटॅमिन-सी एक अँटीऑक्सीडेंट म्हणून काम करते.

आले –

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज सकाळी आल्याचा चहा उपयोगी ठरतो. आले सर्दी, खोकला या लक्षणांवर देखील उपयोगी ठरते. नॅशनल सेंटर फॉर बायो टेक्नोलॉजी इंफॉर्मेशननुसार आले शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

ब्रोकली –

ब्रोकली एक फुलकोबीची प्रजाती आहे. यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक आढळते. यापासून ज्यूस, भाजी अथवा सूप देखील बनवू शकता.

पालक –

पालक पनीर, सूप, ज्यूस म्हणून पालकचे सेवन करता येते. यात व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. पालकच्या सेवनाने लोह व इतर आवश्यक पोषक द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळतात.

लसूण –

लसणाचे सेवन अनेक घरात नियमितरित्या केले जाते. अनेक भाज्यांमध्ये लसूणचा समावेश केला जातो. संक्रमणापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लसूण उपयोगी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment