जागतिक दबावाखाली नरमला चीन, कोरोनासाठी हे घेतले 2 निर्णय

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांचा मृत्यू आहे. हा व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असताना जगाला याची माहिती न दिल्याचा आरोप चीनवर अनेक देशांनी केला आहे. आता चीनने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनद्वारे तयार करण्यात येणारी कोरोनावरील लस जगभरातील लोकांसाठी उपलब्ध असले, असे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक समेंलनात संबोधित जिनपिंग म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या लढाईत चीन 2 बिलियन डॉलरची आर्थिक मदत करेल. विकासशील देशांना कोरोनाच्या लढाईसाठी पुढील 2 वर्षात ही रक्कम दिली जाईल.

व्हिडीओद्वारे समेंलनात सहभागी झालेले जिनपिंग म्हणाले की, कोरोना व्हायरसचे संकट संपल्यावर कोरोनाच्या विरोधातील ग्लोबल रिस्पॉन्सचे मुल्यांकन करण्यात यावे. अनेक देशांनी कोरोनाच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरूवाती भूमिकेचे स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

Leave a Comment