आता मास्क घालून सुद्धा आयफोनमध्ये वापरू शकणार फेसआयडी

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क लावण्याचे आवाहन सरकार वारंवार करत आहे. मास्क लावणे नॉर्मल झाले असले तरी, फेसआयडी असणाऱ्या आयफोन युजर्ससाठी समस्या आहे. यामुळे फोन अनलॉक करण्यास अडचण येत आहे. फेसआयडी युज करण्यासाठी वारंवार मास्क काढावा लागतो. मात्र आता आयओएसच्या नवीन अपडेटमुळे ही समस्या येणार नाही.

आयओएस 13.5 लाँचसाठी तयार असून, हे अपडेट जगभरातील युजर्ससाठी जारी केले जाऊ शकते. या अपडेटमध्ये फेसआयडी फीचरमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. नवीन अपडेटमध्ये फेसआयडी हे समजू शकेल की तुम्ही मास्क घातला आहे. फेसआयडीमध्ये मास्क डिटेक्ट होताच तुम्हाला पासवर्डद्वारे फोन अनलॉक करण्याचा पर्याय मिळेल.

या नवीन अपडेटमध्ये गुगल आणि अ‍ॅपलने तया केलेले एपीआय सपोर्ट देखील मिळेल. या एपीआयद्वारे सार्वजनिक आरोग्य संस्थेचे डेव्हलपर ट्रेसिंग अ‍ॅप तयार करू शकतील. अपडेटमध्ये फेसटाईम ग्रुप कॉलिंगमध्ये युजर्सला अधिक कंट्रोल, बग फिक्स आणि काही बदल देखील मिळतील.

Leave a Comment