व्हिडीओ : चक्क मोरांनी केले ‘ट्रॅफिक जॅम’

18 मे पासून देशातील चौथा लॉकडाऊनचा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी रेल्वे, विमान, मेट्रो, शाळा, कॉलेज इत्यादी गोष्टी बंदच राहणार आहेत. लोक घरात बसून कंटाळले असले तरी या स्थितीचा प्राण्यांवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्राणी शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता असाच एक मोरांचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या मोरांनी रस्ता जाम केला आहे.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, राष्ट्रीय पक्षाद्वारे ट्रॅफिक जाम करण्यात आले. हा व्हिडीओ राजस्थानमधील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर वाहतूक नसल्याने असंख्य मोर रस्त्यावर आले आहेत व त्यांच्यामुळे पुर्ण रस्ताच भरून गेला आहे.  सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांना यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment