सरकारचे आवाहन; कोरोनाला रोखण्यासाठी करा या 6 अ‍ॅप्सचा वापर

कोरोना व्हायरसचा पसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यापासून ते सोशल डिस्टेंसिंगसाठी ऑनलाईन पेमेंटसाठी अ‍ॅप्स वापरले जात आहेत. सरकारने देखील यासाठी काही अ‍ॅप्स लाँच केले असून, नागरिकांना हे अ‍ॅप्स वापरण्याचे आवाहन केले आहे.

Image Credited – thenewsminute

आरोग्य सेतू –

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सरकारने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केले आहे. आतापर्यंत 100 मिलियन पेक्षा अधिक वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आलेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोन युजर्सचा लोकेशन डेटा आणि ब्लूटूथच्या मदतीने युजर कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आला आहे की नाही याची माहिती देते. 11 विविध भाषेत हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

Image Credited – Cheezburger

भीम यूपीआय –

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयवर आधारित भीम अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे कॅशलेस व्यवहार करणे सोपे जाते.

Image Credited – NDTV

उमंग अ‍ॅप –

उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून 600 सेवांचा लाभ घेता येतो. केंद्र सरकारपासून ते स्थानिक स्तरावरील अनेक सेवा या अ‍ॅपमध्ये मिळतात. आधार, पॅन, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, पीएफ अशा अनेक सेवा यात मिळतील.

Image Credited – Google Play

आयुष संजीवनी अ‍ॅप –

या महिन्याच्या सुरूवातीला आयुष मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अ‍ॅप लाँच केले होते. याचा उद्देश आयुषचा वापर व कोरोना रोखण्यासाठी याच्या परिणामांचा डेटा जमा करणे हा आहे.

Image Credited – Pib

जन औषधी सुगम अ‍ॅप –

या अ‍ॅपद्वारे देशभरातील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राद्वारे विक्री केली जाणारी औषधे आणि त्याच्या किंमतीबाबत माहिती मिळेल. जवळील औषध केंद्राची देखील याद्वारे माहिती मिळेल.

Image Credited – Gadgets Now

ई-ग्राम स्वराज अ‍ॅप –

एप्रिल महिन्यात लाँच केलेल्या या अ‍ॅपचा उद्देश पंचायतींमध्ये ई-गव्हर्नसचा वापर वाढवणे हा आहे. ग्रामीण भागाचा विकास या मागील हेतू आहे. ग्राभसभेचे सशक्तीकरण करणे व सेवेमध्ये अनिश्चितता आढळल्यास नागरिक प्रतिनिधींना जाब विचारू शकतील.

Leave a Comment