२२ मे पासून होणार ‘स्वान’ धूमकेतूचे दर्शन

फोटो साभार वॉॉचर्स न्यूज

गेल्या २९ एप्रिल रोजी महाकाय उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून निघून गेला असतानाच आता आणखी एक खगोलीय घटना घडते आहे. एक महाप्रचंड धूमकेतू प्रचंड वेगाने पृथ्वीच्या जवळ येऊ लागला असून २२ मे पासून पहाटेच्या वेळी तो भारतात पाहता येईल असे सांगितले जात आहे. २७ मे रोजी तो पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार असून त्यावेळी आकाशात हिरव्या रंगाची आतषबाजी पाहायला मिळेल. हा धूमकेतू नुसत्या डोळ्यांनीही दिसणार असून त्याचे नामकरण स्वान म्हणजे राजहंस असे केले गेले आहे.

नासा सन अँड स्पेस व नासा अॅस्ट्रो वॉचच्या ट्विटर हँडलवर स्वान धूमकेतू संबंधी माहिती दिली गेली आहे. त्यानुसार तो २७ मे रोजी पृथ्वीच्या कक्षेत येईल. धूमकेतू हे कधीतरीच दिसतात त्यामुळे त्यांना शेंडे नक्षत्र असेही म्हटले जाते. स्वानच्या मागे लांबलचक शेपूटही दिसणार आहे. धूमकेतू हे अंतरिक्षातील धूळ, बारीक दगड, बर्फ, अंतराळातील कण यापासून बनतात आणि सूर्याच्या प्रकाशात आले की चमकतात.

धूमकेतू हे कोणतेही नुकसान करत नाहीत. त्यामुळे ते पृथ्वीच्या कक्षेत आले तरी पृथ्वीला धोका नसतो. अगदी छोट्या आकाराचे धूमकेतू पृथ्वीच्या वातावरणात येतानाच जळून जातात. स्वान सध्या पृथ्वीपासून ४ अब्ज,२ कोटी, ७ लाख, ३ हजार मैलांवर आहे. २७ मे रोजी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. युरोपीय देशात तो सायंकाळी दिसेल तर आशियाई देशात सूर्योदयापूर्वी पहाटे दिसेल. साधारण ११ हजार वर्षातून एकदा तो पृथ्वीला धडकतो त्यावेळी आकाश हिरवे दिसते.

Leave a Comment