आता 349 रुपयात मिळणार 3 जीबी डेटा, जाणून घ्या हे इंटरनेट प्लॅन्स

लॉकडाऊनमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन आणले आहेत. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडा-आयडिया या कंपन्या आपल्या ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा देणारे अनेक प्लॅन ऑफर करत आहे.

जिओ –

जिओ दररोज 3 जीबी डेटाचे 2 प्लॅन देत आहे. जिओ 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स आणि दररोज 100 फ्री एसएमएस देत आहे.

कंपनीचा दररोज 3 जीबी डेटा देणारा आणखी एक 999 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा, 100 फ्री एसएमएस, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिट्स देण्यात आले आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये जिओचे स्बस्क्रिप्शन मिळते.

एअरटेल –

एअरटेलचे दररोज 3 जीबी डेटा देणारे 401 आणि 558 रुपयांचे दोन प्लॅन्स आहेत. 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या कालावधीत दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस मिळत आहे. सोबतच डिज्नी+हॉटस्टारचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळते. 558 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात. याशिवाय झी5 सब्सक्रिप्शन आणि डिव्हाईससाठी फ्री अँटी-व्हायरस मिळते.

व्होडाफोन-आयडिया –

कंपनीच्या डबल डेटा ऑफर अंतर्गत 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा मिळत आहे. दुसरा प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅनमध्ये व्होडाफोन प्ले, झी5 चे मोफत स्बस्क्रिप्शन आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. हे प्लॅन्स ठराविक सर्कल्समध्येच देण्यात येत आहेत.

कंपनीकडून आणखी दोन प्लॅन देशभरातील ग्राहकांसाठी आहेत. यात 56 दिवसांची वैधता असलेला 558 रुपये आणि 28 दिवसांची वैधता असलेल्या 398 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. या दोन्ही प्लॅन्समध्ये दररोज 3 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 फ्री एसएमएस, व्होडाफोन प्ले आणि झी5 चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळत आहे.

Leave a Comment