कोरोनाचे 30 % निगेटिव्ह रिझल्ट असू शकतात चुकीचे – ब्रिटिश तज्ञ

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाधिक टेस्टिंग केले जात आहे. यातील अनेक परिणाम निगेटिव्ह देखील येतात. मात्र ब्रिटिश वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, कोरोनाचे 30 टक्के निगेटिव्ह रिझल्ट हे चुकीचे असू शकतात. म्हणजेच ज्यांना व्हायरस मुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यांच्याद्वारे संसर्ग होण्याची शक्यता आहे.

तज्ञांनुसार, याचे कारण चुकीचे स्वॅबिंग असू शकते. आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांचे स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र त्यांच्याकडून देखील चूक होऊ शकते.

ब्रिटिश वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, टेस्टच्या परिणामांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास, त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही व त्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. ब्रिटनच्या आरोग्य प्रमुखांचे म्हणणे आहे की स्नायू दुखणे, चव न लागणे, डोके दुखी या लक्षणांना कोरोनामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, जे संकट निर्माण करू शकते.

Leave a Comment