ईदसाठी मुंबईहून गावी दाखल झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला असून त्यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदसाठी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय मुंबईहून उत्तर प्रदेशला गेल्यामुळे नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबियांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय मुंबईहून उत्तर प्रदेशातील बुढाना या गावी गेले. आंतरराज्य प्रवास केल्याने नवाझुद्दीनच्या सर्व कुटुंबाला 14 दिवसांसाठी घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शुक्रवारी आपल्या कुटुंबासह नवाजुद्दीन सिद्दीकी बुढाना गावी पोहोचला. त्या सर्वांची तिथे पूर्ण तपासणीही करण्यात आली. नवाजुद्दीन आणि त्याच्यासोबत असलेल्या सर्व सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने खासगी वाहनातून आपल्या गावी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment