कोरोना व्हायरसमुळे मागील जवळपास दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. आजपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात सरकारने नियम शिथिल केले आहे, मात्र अनेक कठोर नियम देखील आहेत. या टप्प्यात 12 चूका करणे महागात पडू शकते.
लॉकडाऊन 4.0 मध्ये करू नका या 12 चुका
फेस मास्क –
सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यालयात फेस मास्क नक्की लावावा. मास्कच्या जागी रुमाल देखील बांधू शकता.
थुंकू नये –
सार्वजनिक थुंकल्यावर दंड भरावा लागू शकतो. शिक्षा देखील होऊ शकते, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
सोशल डिस्टेंसिंग –
घरातून बाहेर पडल्यानंतर देखील सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे. सोशल डिस्टेंसिंग कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदतगार ठरते.
लग्नात 50 पेक्षा अधिक लोक नाही –
लॉकडाऊनच्या काळात अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले होते. आता लग्नासाठी देखील नियम बनविण्यात आले आहेत. कोणत्याही लग्नात 50 पेक्षा अधिक लोक येऊ शकत नाही व सोशल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे आहे.
अंत्यसंस्कारासाठी 20 लोक –
अंत्यसंस्कारासाठी देखील केवळ 20 लोकच उपस्थित राहू शकतात. यावेळी देखील सोशल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी नशा अथवा धुम्रपान –
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गुटखा, पान खाण्यावर बंदी आहे.
दुकानदार-ग्राहकांसाठी नियम –
दुकानदाराने लक्ष ठेवावे की दुकानात एकावेळी 5 पेक्षा अधिक लोक नसावेत. ग्राहकांमध्ये 6 फूट अंतर ठेवावे. या नियमांचे पालन न केल्यास कारवाई होऊ शकते.
ऑफिस –
जेवढे अधिक कर्मचारी घरून काम करू शकतील, तेवढ्यांना कार्यालयाने परवानगी द्यावी. जबरदस्तीने कर्मचाऱ्यांना कामावर बोलवू नये.
कार्यालयात सोशल डिस्टेंसिंग –
ऑफिसमध्ये काम करताना देखील सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे. कर्मचाऱ्यांना वेळ ठरून द्यावी.
थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर गरजेच –
ऑफिसमध्ये येण्या व बाहेर जाण्याआधी थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास कारवाई होऊ शकते. कर्मचाऱ्याने थर्मल स्कॅनिंग न केल्यास कारवाई होऊ शकते.
सॅनिटायझेशन गरजेचे –
ऑफिस अथवा कामाचे ठिकाण पुर्णपणे सॅनिटायझ करण्याची काळजी कंपनीने घ्यावी. दरवाजाचे हँडल, कॉम्प्युटर सॅनिटायझ करावे.
लंच ब्रेक आणि शिफ्टमध्ये काम –
कंपन्यांनी लंच ब्रेकचे नियम बनवावे. लंच ब्रेकची वेळ ठरवून दिल्यास गर्दी होणार नाही. तसेच कामाची वेळ देखील ठरवून द्यावी.