आफ्रिदी काश्मिर विसर, तुझ्या भंगार देशाकडे लक्ष दे – सुरेश रैना

संपुर्ण जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने काश्मिर मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये आफ्रिदी कोरोनापेक्षा अधिक विष मोदींच्या मनात असल्याचे म्हटले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतातील आजीमाजी क्रिकेटपटूनी आफ्रिदीवर जोरदार टीका केली होती. गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, शिखर धवननंतर आता सुरैश रैनाने देखील यावरून आफ्रिदीवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

काश्मिरचा विषय सोडून, स्वतःच्या अपयशी देशाकडे आफ्रिदीने आधी लक्ष द्यावे, असे रैनाने म्हटले आहे.

रैनाने ट्विट केले की, असे देवा ! एक व्यक्ती स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी काय काय करू शकतो. खासकरून अशा देशातील व्यक्ती जे भीकेवर जगत आहेत. त्यामुळे काश्मिरचा मुद्दा बाजूला सोडून स्वतःच्या अपयशी देशाकडे लक्ष द्यावे. मी एक अभिमानी काश्मिरी आहे आणि हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील. जय हिंद !

युवराज सिंह, हरभजन सिंह, गौतम गंभीर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आफ्रिदीला सडेतोड उत्तर देत काश्मिर भारताचा नेहमीच अविभाज्य भाग राहिल असे म्हटले आहे.

Leave a Comment