जगभरात मांसाहाराला पर्याय ठरत आहे भारताचे फणस

दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात आढळणारे फणस शाकाहारी लोकांच्या आवडीचे आहे. दक्षिण आशियामध्ये फणस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. दरवर्षी कितीतरी टन हे फळ वाया जाते. भारत हा फणसाचा सर्वात मोठा उत्पादक असून, आता मांसाहारचा विकल्प म्हणून फणसाकडे पाहिले जात आहे.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वर्गीज थरकानक यांनी सांगितले की, परदेशातून फणसाविषयी मोठ्या प्रमाणात माहिती घेतली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फणसाविषयी रस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फणसाचा उपयोग हा केक, आयस्क्रीम आणि ज्यूस बनविण्यासाठी केला जातो.

पश्चिमेकडील देशांमध्ये फणस मांसाहाराचा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे, एवढेच नाहीतर याला पिझ्झा टॉपिंगच्या रुपात वापरले जात आहे. फणसापासून बनलेले टाको खाणे लोकांना आवडते. याशिवाय याचे कटलेट देखील लोकांना आवडत आहेत.

मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या जेम्स जोसेफने सांगितले की, कोरोनामुळे लोक चिकन खाणे घाबरत असून, अशा स्थिततीत फणस खात आहेत. केरळमध्ये लॉकडाऊननंतर फणसाची मागणी वाढली आहे. फणसात अनेक पोषकतत्व आहेत. याच्या उत्पादनासाठी जास्त खर्चाची देखील आवश्यकता नाही. केवळ तामिळनाडू आणि केरळमध्येच दररोज 100 मेट्रिक टन फणसाची मागणी केली जाते. याचे दरवर्षीचे टर्न ओव्हर 19.8 मिलियन डॉलर आहे. मात्र आता बांगलादेश आणि थायलंडसारख्या देशांनी देखील याचे उत्पादन सुरू केले आहे.

Leave a Comment