कोरोनाच्या नावावर फसवणूक, सरकारने केले सावध

सायबर इमर्जेंसी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) कोव्हिड-19 संबंधीत स्कॅमबाबत नागरिकांना सावध केले आहे. सायबर गुन्हेगार बनावट चॅरिटी स्कीमद्वारे महामारीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. फिशिंग स्कॅमद्वारे या गुन्हेगारांचा उद्देश लोकांची खाजगी बँक माहिती चोरी करणे हा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस आणि ईमेलद्वारे फ्रॉड फिशिंग मेसेज पाठवत आहे. सीईआरटी-इन चेतावणी दिली की, स्कॅमर्स व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ईमेल आणि दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे फसवत आहेत. आरोग्य सेतू अ‍ॅपशी संबंधित फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. गुन्हेगार एचआर डिपार्टमेंट, सीईओ आणि व्यक्ती बनून बोलत आहेत व फेक मेसेज पसरत आहेत.

सायबर क्रिमिनल्स डब्ल्यूएचओच्या नावावरून फिशिंग ईमेल पाठवत आहेत व हे ईमेल डब्ल्यूएचओच्या डोमेनद्वारे पाठवले असे वाटतात. अशा ईमेल्समध्ये मॅलिशस फाइल्स आणि यूआरएल असू शकतात. नवीन फिशिंग डोमेनमध्ये ‘relief package’, ‘safety tips during corona’, ‘corona testing kit’, ‘corona vaccine’, ‘payment and donation during corona इत्यादींचा समावेश आहे. अशा फिशिंग डोमेनपासून सावध राहावे.

कोणत्याही ईमेलमधील फाइल, डॉक्युमेंटला डाउनलोड, उघडण्याआधी सावध राहावे. यूआरएल चेक करावे. अनोळखी लोक, अनोळखी वेबसाइट्सपासून सावध राहावे. प्राइज, रिवॉर्ड्स, कॅशबॅक ऑफर मेसेजवर विश्वास ठेऊ नये. अँटीव्हायरस, फायरवॉलमध्ये सेफ ब्राउजिंग टूल्स आणि फिल्टरिंग टूल्सचा वापर करावा. व्हिडीओ कॉल्स अ‍ॅप झूम, गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मिळत्या जुळत्या अ‍ॅपद्वारे फसवणुक करत आहे.

Leave a Comment