महिंद्राच्या या कार्सवर मिळत आहे लाखो रुपयांची सूट

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर आता ऑटोमोबाईल कंपन्यांचे शोरूम उघडण्यास सुरूवात झाली आहे. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार्सवर आकर्षक ऑफर देत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपल्या कार्सवर 3.05 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Image Credited – navbharattimes

केयूव्ही100 एनएक्सटी –

महिंद्राच्या या एसयूव्हीवर 70,805 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 38,055 रुपये कॅश डिस्काउंट, 28750 रुपये ऐक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. या एसयूव्हीची किंमत 5.54 लाखांपासून ते 7.16 लाख रुपये आहे.

Image Credited – navbharattimes

बोलेरो बीएस-6 –

महिंद्राच्या या लोकप्रिय एसयूव्हीवर 14 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. यात 10 हजार रुपये ऐक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. महिंद्राने या एसयूव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. बोलेराची किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरू आहे.

Image Credited – navbharattimes

एक्सयूव्ही300 बीएस-6 –

महिंद्राच्या या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर 69,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यात 35 हजार कॅश डिस्काउंट, 30 हजार रुपये ऐक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. एसयूव्हीची सुरूवाती किंमत 8.30 लाख रुपये आहे.

Image Credited – navbharattimes

स्कॉर्पियो बीएस-6 –

महिंद्राच्या या लोकप्रिय एसयूव्हीवर 65 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळत आहेत. यात 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 30 हजार रुपये ऐक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. स्कॉर्पियोची किंमत 12.40 लाख रुपयांपासून ते 16 लाख रुपये आहे.

Image Credited – navbharattimes

एक्सयूव्ही500 बीएस-6 –

या एसयूव्ही 49 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 40 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 9 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. या एसयूव्हीची किंमत 13.20 लाख ते 17.70 लाख रुपये आहे.

Image Credited – navbharattimes

अल्ट्रॉस जी4 बीएस6 –

या एसयूव्हीवर 3.05 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत असून,  यात 2.4 लाख रुपये कॅश डिस्काउंट, 50 हजार रुपये ऐक्सचेंज बोनस आणि 15 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. या प्लॅगशिपच्या एसयूव्हीची किंमत 28.69 लाख ते 31.69 लाख रुपये आहे.

महिंद्राच्या या एसयूव्हींवर मिळणारी ऑफर 31 मे पर्यंत असून, एसयूव्हीचे व्हेरिएंट, रंग, शहर आणि डीलरशीपनुसार ऑफर वेगवेगळी आहे.

Leave a Comment