बाळांना कावडमध्ये बसवून कामगाराचा 1300 किमी प्रवास

लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक हाल कामगारांचे झाले आहे. परराज्यात अडकलेले हे कामगार आपल्या लहान मुलांसह जे भेटेल ते खात घराच्या दिशेने निघाले आहेत. या खडतर प्रवासात लहान मुलांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशा कामगारंचे अनेक फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत आहेत. आता अशाच एका आंध्रप्रदेशमधील एका कुटुंबाचा फोटो व्हायरल होत आहे. 8 जणांचे हे कुटुंब आपल्या दोन लहान बाळांना कावडमध्ये बसवून आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या दिशेने 1300 किमीच्या प्रवासाला निघाले आहे. नवभारत टाईम्सने या संदर्भात वृत्त दिले आहे.

हेड कॉन्स्टेंबल जगदीश कुमार यांनी सांगितले की, आम्हाला समजले की दोन लहान मुलांसह 8 जणांचे कुटुंब अडोनी-येम्मिगानूर रोडवरून चालत निघाले आहे. त्यांना कुरनूल जिल्ह्याच्या कलेक्टरकडे मदतीसाठी जाण्यास सांगितले. मात्र ते हैदराबादला जाण्यावर ठाम राहिले, जेथून त्यांना घरासाठी रेल्वे मिळण्याची शक्यता होती.

त्यांनी सांगितले की, विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेवण, पाणी, बिस्किट आणि काही रोख पैसे देण्यात आले. त्यांना एका ट्रकमध्ये बसवून ड्रायव्हरला पैसे न घेण्याचे निर्देश देण्यात आले. कुटुंबातील व्यक्तीला नंबर देखील दिला व काही अडचण आल्यास फोन करण्यास सांगितले

Leave a Comment