कोरोनाचे नियम मोडल्यावर हा देश देणार सर्वात कठोर शिक्षा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध देशातील सरकारने नियमावली जाहीर केली आहे. गर्दी टाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे या नियमांचा समावेश आहे. कतारने देखील देशात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याविषयी नियम कठोर केले आहेत. कतारमध्ये मास्क न लावल्यास जगातील सर्वात कठोर शिक्षा दिली जाणार आहे. येथे नियम मोडल्यास लोकांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळेल. सोबतच मोठी दंडाची रक्कम भरावी लागेल.

कतारमध्ये कोरोना संक्रमणाचा दर सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम तोडणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे ठरवले आहे. येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या पुढे गेला आहे. कतारमध्ये मास्क न घालणाऱ्यांना 41.7 लाख रुपये दंड भरावा लागेल. मात्र गाडीत एकटे प्रवास करत असताना मास्क घालण्यास सुट देण्यात आली आहे. नवीन नियम लागू करण्यापुर्वी पोलीस लोकांना याबाबत माहिती देत आहेत.

आफ्रिकी देश चाडमध्ये मास्क न घातल्यावर 15 दिवस कारावास भोगावा लागू शकतो. तर मोरक्कोमध्ये 3 महिने कारावास होऊ शकतो.

Leave a Comment