भुकेसमोर कामगार हतबल, लुटली रेल्वे स्टेशनवरील फूड वेंडिंग मशीन

लॉकडाऊनमुळे एकीकडे कामगार आपल्या घरी जाण्यासाठी धडपडत आहेत. तर दुसरीकडे त्यांना भुकेशी देखील लढावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्टेशनवर पाहिला मिळाला. येथे कामगार भुकेमुळे स्टेशनवरील एका फूड वेडिंग मशीनवर तुटून पडले व त्यातील खाण्या-पिण्याच्या वस्तू लुटल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कामगारांना घेऊन बंगळुरूवरून हाजीपूरला जाणाऱ्या स्पेशल रेल्वे काही वेळासाठी जबलपूर रेल्वे स्टेशवर थांबविण्यात आले होते. रेल्वेमधील शेकडो प्रवासी मजूरांना रेल्वेकडून जेवण दिले जाणार होते. मात्र बराच वेळ वाट पाहून देखील जेवण न मिळाल्याने या कामगारांनी स्टेशनवरील फूड वेडिंग मशीनची तोडफोड करत त्यातील वस्तू लुटल्या. लोक एकमेंकाच्या हातातील वस्तू ओढून घेण्यासाटी भांडण करत होते.

वेंडिंग मशीनच्या कर्मचाऱ्याने या घटनेबाबत जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कर्मचाऱ्याने आरोप केला की या घटनेत कंपनीचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले.

Leave a Comment