कोरोनावरील औषधाचा लावला शोध, 60 लोक केले बरे – बांगलादेशी डॉक्टरांचा दावा

जगभरात कोरोना व्हायरसवरील औषधाचा शोध सुरू आहे. आता बांगलादेशच्या एका वैद्यकीय टीमने दावा केला आहे की त्यांना कोरोना व्हायरसवरील औषधाच्या संशोधनामध्ये यश मिळाले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की दोन औषधांच्या मिश्रणाने कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत.

बांगलादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद तारेख आलम म्हणाले की, आधीच उपलब्ध असलेल्या दोन औषधांच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला. हे औषध 60 रुग्णांना देण्यात आले व सर्वजण बरे झाले. रुग्णांना इव्हर्मेक्टिन आणि डॉक्सीसाइक्लिन नावाचे औषध दिले. डोक्सीसाइक्लिन अँटीबायोटिक आहे, तर इव्हर्मेक्टीन अँन्टीप्रोटोझोल औषध म्हणून वापरले जाते.

डॉ. आलम यांच्यानुसार, त्यांच्या टीमने या औषधांचे उपयोग केवळ कोरोनारुग्णावर केला. या रुग्णांमध्ये सुरूवातीपासूनच श्वास घेण्याची समस्या होती. ही औषधे एवढी प्रभावी होती की रुग्ण 4 दिवसात बरे झाले. रुग्णांचे अर्धे लक्षण 3 दिवसात गायब झाले. याशिवाय औषधाचे साइड इफेक्ट पाहण्यास मिळाले नाही. सरकारी अधिकाऱ्यांना देखील औषधांबाबत माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय प्रक्रिया करता येईल. त्यांची टीम रिसर्च पेपर तयार करत आहे, जो इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित होईल.

दरम्यान, दुसरीकडे इटली, इस्त्रायल, अमेरिका, ब्रिटन, चीनसह अनेक देश कोरोनावरील लसीवर काम करत आहेत. इटली आणि इस्त्रायलने अँटीबॉडी तयार केल्याचा दावा केला आहे. ब्रिटनची ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी देखील लस तयार करत आहे.

Leave a Comment