येथे 80 वरून थेट 300 रुपये किलोने विकले जात आहे चिकन

कोरोना व्हायरसच्या भितीमुळे मागणीत आलेल्या घटमुळे लॉकडाऊनच्या काळात चिकनचे दर घसरले होते. मात्र आता पुन्हा चिकनची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत. कर्नाटकच्या हुबली भागात चिकन 80 रुपये प्रति किलो होते, जे आता 300 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

चिकन सेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नागराज पट्टन म्हणाले की, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर चिकनचा भाव खूप कमी झाला होता. यानंतर शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन बंद केले होते. त्यामुळे आता मागणीच्या तुलनेत आपुर्ती कमी असल्याने चिकनच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कुक्कुटपालन व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे. पॉल्ट्री फॉर्ममध्ये देखील चिकन कमी असून, 100 ऑर्डर केल्यावर 50 मिळतात. चिकनचे भाव वाढल्याने ग्राहकांनी देखील चिकन कमी घेण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment