सीबीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे नवे वेळापत्रक जाहीर


नवी दिल्ली – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान या नव्या वेळापत्रकाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. आज cbse.nic.in या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता या नव्या वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सार्‍या विषयांच्या परीक्षा न घेता आता केवळ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 29 मेजर सब्जेक्ट्सचा समावेश असेल. या परीक्षांना 1 जुलैला होम सायन्सच्या विषयापासून सुरूवात होणार आहे.

दरम्यान वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार असल्याचे शनिवारी सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जेईई मेन्स, अ‍ॅडव्हांस आणि नीट 2020 परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर 12 वीचे सारे पेपर सुरळीत पडले आहेत. पण 10 वीचा एक पेपर रद्द करण्यात आला आहे. आता लवकरच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षा वेळापत्रक

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी परीक्षा वेळापत्रक


आता नव्याने सीबीएसई बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सारा अभ्यास रिव्हाईस करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 9वी आणि 11 वीमध्ये नापास झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी एक संधी देखील दिली आहे. आता शाळांमार्फत ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.

Leave a Comment