लॉकडाऊन 4.0 मध्ये कर्नाटकने 31 मे पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील लोकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी माहिती दिली.
कर्नाटकची महाराष्ट्रासह या 3 राज्यातील लोकांवर बंदी
येडीयुरप्पा म्हणाले की, राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्णपणे लॉकडाऊन असेल. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अमंलबजावणी केली जाईल व इतर भागात आर्थिक गतिविधींना परवानगी असेल. ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन बस, खाजगी बस सुरू होतील व राज्यांतर्गत रेल्वेस परवानगी देण्यात येईल.
दरम्यान, केंद्र सरकारने देशभरात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला असून, राज्यांना प्रत्येक झोननुसार नवीन नियमावली ठरविण्यास सांगण्यात आले आहे.