आफ्रिदीला त्याच्या बायोपिकमध्ये हवे आमिर खान आणि टॉम क्रूज; नेटकरी म्हणाले, विकावा लागेल पाकिस्तान!


आपल्या वाकड्या तिकड्या वक्तव्य तसेच आणि अति शहाणपणामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा सोशल मीडियात बराच चर्चेत असतो. नुकतेच त्याने संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना भारताविरोधात गरळ ओकत काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. याच दरम्यान आफ्रिदीवर नेटकऱ्यांनी आणखी एका प्रतिक्रियेमुळे चांगलेच फैलावर घेतले आहे.


त्याच्यावर आधारीत बायोपिकमध्ये कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न शाहीद आफ्रिदीला विचारला असता आफ्रिदी म्हणाला की, आपल्या बायोपिकमध्ये टॉक क्रूजने त्याची भुमिका करायला हवी. तर आमिर खानने त्याच्या उर्दू भाषेतील वर्जनमध्ये काम करावे अशी प्रतिक्रीया दिली. पण त्याच्या या प्रतिक्रियेवर भारतीय नेटकरी मात्र पोट धरुन हसायला लागले आहेतच त्याच बरोबर त्याला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी आफ्रिदीवर जोरदार टीका केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, पाकिस्तानला तु दोनदा विकले तरीसुद्धा तुम्ही लोक आमिर खानचे मानधन देऊ शकणार नाहीत. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, टॉम क्रूझला बायोपिकमध्ये घेण्यासाठी तुला पुर्ण पाकिस्तान विकावा लागेल, पण तो देखील कमी पडेल. तर एकजण म्हणतो, चित्रपटाचे पहिले दृश्य असे असेल की शाहिद आफ्रिदी फलंदाजीला उतरुन पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि शेवटच्या सीनमध्येही शाहिद आफ्रिदी फलंदाजीला आला होता आणि शून्यावर बाद झाला होता.

Leave a Comment