केळी खरेदी करताना अशी घ्यावी खबरदारी

फोटो साभार नवभारत टाईम्स

केळे हे वर्षभर मिळणारे, सहज परवडणारे आणि अनेक जीवनसत्वे व पोषण मूल्ये असलेले फळ आहे. केळे खाल्ल्याने लहान मुलांपासून वृध्द व्यक्तींपर्यंत सर्वाना आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. जिम अथवा धावण्यासारखा अधिक दमविणारा व्यायाम करणाऱ्या व्यक्ती एकावेळी २-३ केळी सहज खातात त्यामुळे त्यांना त्वरित उर्जा मिळते. आपल्याकडे बाजारात केळी सहज उपलब्ध असतात आणि अगदी सहज केळी खरेदी केळी जातात.

पण केळी खरेदी करताना काही खबरदारी नक्की घ्यायला हवी ज्यामुळे या फळाचे गुण आणि स्वाद यांचा आपल्याला अधिक फायदा मिळू शकेल. केळे खरेदी करताना पूर्ण पिवळ्या रंगाचे आणि साल थोडी तजेलदार असेल असे घ्यावे. सालीवर काळे डाग खूप प्रमाणात असतील तर अशी केळी चवीला गोड असतात पण ती लवकर खराब होतात.

आपण केळे कशासाठी घेत आहोत आणि एका दिवसात आपण किती केळी खाणार याचा अंदाज घेऊन केळी खरेदी करावी. उदाहरणार्थ सबंध कुटुंबासाठी केळ्याचा शेक बनवायचा असेल तर केळी जास्त लागतील पण रोज एकच केळे खाल्ले जात असेल तर ३ -४ दिवस पुरतील इतकीच केळी खरेदी करावीत. केळी लहान, मध्यम आणि मोठ्या अश्या आकारात मिळतात. खरेदी करताना जाडीला चांगली आणि मध्यम आकाराची केळी खरेदी करणे उत्तम. लहान आकाराची केळी कच्ची असू शकतात. पूर्ण तयार केळी स्वादाला जास्त चांगली असतात.

अर्धवट कच्ची केळी पोटदुखी निर्माण करू शकतात. सालीवर हिरवटपणा असेल तर ती केळी पूर्ण पिकलेली नसतात. पण घरी नेऊन लगेच त्याचा वापर करणार नसाल तर अशी केळी खरेदी करण्यास हरकत नसते. केळी लगेच पिकतात. अशी थोडी कच्ची केळी अधिक दिवस चांगली राहू शकतात. पण पूर्ण पिकल्याशिवाय ती खाऊ नयेत. स्वस्त आहेत म्हणून खूप केळी खरेदी करणे टाळावे. अशी केळी दिवसभर सुद्धा टिकत नाहीत आणि त्यातली बरीच फेकून द्यावी लागतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment