ट्रम्प यांच्या हस्ते अमेरिकी स्पेस फोर्स झेंड्याचे अनावरण

फोटो साभार  इनएग्झीक्यूटीव्ह

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या हस्ते अमेरिकी स्पेस फोर्सच्या झेंड्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम व्हाईट हाउसच्या ओव्हल ऑफिस मध्ये पार पडला. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी आमची सुरक्षा आणि हल्ल्यासाठी स्पेस हेच आमचे भविष्य आहे आणि आम्हीच अंतराळाचे नेते आहोत असे रिपोर्ट आम्हाला मिळाले आहेत असे सांगितले.

यावेळी ट्रम्प म्हणाले अमेरिका सुपरडुपर मिसाईल तयार करत असून त्याचा वेग सध्याच्या मिसाईलच्या तुलनेत १७ पट अधिक आहे. यावेळी ज्या झेंड्याचे अनावरण केले गेले त्याचा रंग गडद निळा असून बॅकग्राउंड काळ्या रंगाची आहे. त्यावर तीन मोठे स्टार्स आहेत आणि स्पेसफोर्सचा सिग्नेचर डेल्टा लोगो मध्यात आहे. त्यावर युनायटेड स्टेट स्पेस फोर्स अशी अक्षरे आहेत.

स्पेस फोर्सची अधिकृत स्थापना डिसेंबर २०१९ मध्ये झाली असून या स्वतंत्र अंतराळ सैन्य बलात १६००० सैनिक व सैनिकेतर कर्मचारी आहेत. मार्च अखेर युएसए स्पेस फोर्सचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा मिशन लाँच केले गेले असून त्या अंतर्गत अल्ट्रा सिक्युअर मिलिटरी कम्युनिकेशन सॅटेलाईट ओर्बिट मध्ये सोडला गेला होता. लॉकहिड मार्टीन अॅडव्हान्स्ड एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी असलेला हा उपग्रह फ्लोरिडाच्या केप कॅनविरल मधून व्ही ५५१ रॉकेटच्या सहाय्याने लाँच केला गेला होता.

Leave a Comment