जेसिंडाना रेस्टोरंटमध्ये जागा नाही म्हणून दिला नाही प्रवेश

फोटो साभार डेली मेल

आपण जर कोणतेही नियम अथवा बंधने लागू केली असतील तर त्याचे प्रथम पालन आपणच करावे याचा एक छान नमुना नुकताच दिसून आला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्दन त्यांच्या नियोजित वरासह एका रेस्टॉरंट मध्ये ब्रंच साठी गेल्या पण तेथील वेटरने त्यांना सोशल डीस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असल्याने आत जागा नाही असे सांगून बाहेरच थांबविले. शनिवारी जेसिंदा आणि क्लार्क गेफोर्ड वेलिंग्टन येथील ऑलीव्ह रेस्टॉरंट मध्ये गेले होते तेथे हा प्रकार घडला.

न्यूझीलंड मध्ये कोविड १९ मुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता मागे घेण्यात आला असून दुकाने, रेस्टॉरंट, मॉल्स उघडले आहेत. मात्र अजूनही तेथे काही नियम पाळावे लागत आहेत त्यातील एक मुख्य नियम आहे सोशल डीस्टन्सिंगचे पालन. जेसिंडा आणि गेफोर्ड ऑलीव्ह मध्ये गेले तेव्हा आतील जागा फुल आहे ऐकताच तेथून परत फिरले. दरम्यान एक जागा रिकामी होताच रेस्टोरंटच्या सेवकाने त्यांना पळत जाऊन गाठले आणि जागा रिकामी झाल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनी तेथे ब्रंचचा आस्वाद घेतला. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच ते वागले. आणि हॉटेल मध्येही त्यांना सर्व सामान्य ग्राहकासाराखीच ट्रीटमेंट दिली गेल्याचे समजते.

या प्रकारावर क्लार्क गेफोर्ड यांनी ट्विट करून ओलिव मध्ये गेल्याबरोबर जागा मिळाली नाही याची जबाबदारी स्वीकारून असे सांगितले की मी अगोदर जागा रिझर्व करून ठेवण्याची खबरदारी घेतली नाही ही माझी चूक. पण आम्हाला या हॉटेल मध्ये चांगली ट्रीटमेंट मिळाली. जेवण उत्तम होते. जेसिंडा यांच्या प्रेस सचिवांनी पंतप्रधानांना जागा मिळण्यासाठी वाट पहावी लागली असे सांगितले. न्यूझीलंड मध्ये रविवार पर्यंत ११४९ करोना केसेस नोंदल्या गेल्या असून आत्तापर्यंत २१ मृत्यू झाले आहेत. करोना नियंत्रणात आणण्यासाठी जेसिंडा यांनी केलेल्या उपाययोजनाचे जगभर कौतुक झाले आहे.

Leave a Comment