बोलण्या, चालण्यात समस्या असू शकते कोरोनाचे लक्षण – WHO

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणाबाबत सावध केले आहे. डब्ल्यूएचओच्या विशेषज्ञांनुसार बोलताना येणारी समस्या देखील व्हायरसचे गंभीर लक्षण असू शकते. आतापर्यंत डॉक्टर खोकला, ताप यांना या आजाराचे मुख्य लक्षण मानत होते.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, अन्य लक्षणांसोबत बोलताना समस्या येणे हे देखील एक संभावित लक्षण आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीला बोलण्यासोबतच चालताना देखील समस्या येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.

संघटनेने म्हटले आहे की, व्हायरसने संक्रमित झालेल्या लोकांना श्वास घेण्यास समस्या येते व ते कोणतेही विशेष उपचार न घेता बरे होऊ शकतात. गंभीर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास समस्या आणि छातीत दुखणे, बोलणे बंद होणे आणि चालण्यास समस्या येणे याचा समावेश आहे.

मात्र त्यांनी स्पष्ट केले की, बोलताना येणारी समस्या नेहमीच कोरोना व्हायरसचे लक्षण नसते. दुसऱ्या कारणांमुळे देखील अशी समस्या येऊ शकते.

Leave a Comment