किटकनाशकांची फवारणी आरोग्यासाठी धोकादायक – WHO

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी उघड्या जागेवर किटकनाशकांची फवारणी करू नये. याचा कोरोना व्हायरसवर कोणताही पर्याय होणार नाही, उलट हे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याची चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की गल्ली आणि बाजारांमध्ये किटकनाशकांची फवारणी जास्त उपयोगी ठरत नाही, कारण धूळ आणि घाणीमुळे ते निष्क्रिय होते.

संघटनेनुसार, एखाद्या व्यक्तीवर थेट किटकनाशकाची फवारणी केल्यास गंभीर आजार होऊ शकतात. मानवी शरीरावर याची फवारणी करू नये. कारण यामुळे शारीरिक आणि मानसिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

लोकांवर क्लोरिन अथवा अन्य विषारी रसायनांची फवारणी केल्यावर डोळे आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. किटकनाशकाचा वापर करताना कापड वापरावे, जेणेकरून हे नुकसानकारक ठरणार नाही.

Leave a Comment