टाटा समूह या 4 हॉस्पिटलचे करणार कोव्हिड-19 सेंटरमध्ये रुपांतर

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे लोकांना क्वारंटाईन, आयसोलेशनसाठी हॉटेल, शाळा, स्टेडियम देखील आयसोलेशन सेंटरमध्ये बदलले जात आहे. अनेक उद्योजक या महामारीच्या लढ्यात मदत करत आहेत. टाटा ट्रस्ट देखील या लढ्यात मदत करत असून, ट्रस्ट महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील 4 सरकारी हॉस्पिटलला कोव्हिड-19 सेंटर्समध्ये अपग्रेड करत आहेत. हे हॉस्पिटल 15 जूनपर्यंत उपलब्ध होतील.

टाटा ट्रस्ट सांगलीमध्ये 50 बेड्सचे हॉस्पिटल, बुलढाणामध्ये 106 बेड्सचे हॉस्पिटल उभारत आहे. तर उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर येथे 168 आणि गोंडा येथे 106 बेड्सचे हॉस्पिटल उभारत आहे. यामध्ये इन-पेशंट आणि आउट-पेशंट विंग्स अशा सुविधा कायमस्वरूपी असतील.

या सर्व हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत सेवा, लहान ऑपरेशन थेएटर, पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी, रक्तसाठा करण्याची क्षमता आणि टेलि-मेडिसीन यूनिट्सची सुविधा आहे. याची निर्मिती टाटा प्रोजेक्ट्स करत असून, डिझाईन एडिफिस कंसल्टंस आणि उपकरण सर्वोत्तम उत्पादकांकडून घेतले जात आहेत.

याआधी देखील टाटा ट्रस्टने राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील खाजगी व सरकारी हॉस्पिटल्सला पीपीई किट दिले होते. यात कव्हरऑल्स, एन95 मास्क, सर्जिकल मास्क, मोजे आणि गॉग्लसचा समावेश होते.

Leave a Comment