सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे भारतात कोट्यावधी युजर्स आहेत. हॅकर्स या प्लॅटफॉर्मवर अकाउंट हॅक करणे, डाटा चोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंग्समध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत.
फेसबुक अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित करा ही 5 कामे

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन –
फेसबुक अकाउंटचा पासवर्ड स्ट्राँग असणे आवश्यक आहे. सोबतच युजर्स अकाउंट सेटिंग्समध्ये जाऊन टू फॅक्र ऑथेंटिकेशन सुरू करू शकता. हे सुरू केल्यानंतर प्रत्येकवेळी नवीन डिव्हाईसवर लॉग इन करताना ओटीपी येईल व ओटीपीच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.

थर्ड पार्टी अॅप्सवर लॉग-इन –
जर फेसबुकच्या मदतीने थर्टी पार्टी अॅप्स जसे की गेम अथवा वेबसाईटवर लॉग इन केले असल्यास, वापर झाल्यावर ते अॅप्स काढून टाकावे. यासाठी अकाउंट सेटिंग्समध्ये सिक्युरिटी पर्यायामध्ये अॅप्स आणि वेबसाइट्सवर क्लिक करावे लागेल. गरज नसल्यास येथून तुम्ही हे अॅप्स आणि वेबसाइट्स रिमूव्ह करू शकता.

ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स –
फेसबुकच्या सेटिंग्स आणि सिक्युरिटी अँड लॉग इनवर जाऊन 3 ते 5 फेसबुक मित्रांना ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स बनवू शकता. जर अकाउंट हॅक झाले अथवा पासवर्ड विसरल्यास हे मित्र मदत करतील. फेसबुक या अकाउंट्सवर वेगवेगळे कोड पाठवेल व हे सर्व कोड टाकल्यानंतर तुम्ही अकाउंट पुन्हा सुरू करू शकता.

फेसबुक डेटा –
फेसबुक इंफॉर्मेशन पेजवर गेल्यावर युजर्सला ‘Manage your data’ हा शॉर्टकट पर्याय देखील मिळतो. येथे युजर्सला फेसबुक अथवा इंस्टाग्राम, कोठे डेटा मॅनेज करायचा आहे हे विचारले जाईल. येथे युजर्स लोकेशन डेटा, फेस रेकग्निशन आणि अपलोड करण्यात आलेले कॉन्टॅक्ट्स हा सर्व डेटा मॅनेज करू शकतात. कोणत्या अॅप्ससोबत डेटा शेअर करायचा हे देखील युजर्स निवडू शकतील.

डिव्हाईस रिव्ह्यू –
कोणत्या डिव्हाईसवर फेसबुक चालू आहे, हे युजर्स सेटिंग्समध्ये जाऊन पाहू शकतात. जर एखाद्या अनोळखी डिव्हाईसवर तुमचे अकाउंट सुरू असल्यास तुम्ही तेथून अकाउंट रिमूव्ह करू शकता. सेटिंग्समध्ये Security & Login पर्यायावर गेल्यावर Where you have logged in दिसेल. येथे तुमचे अकाउंट लॉग इन असलेले सर्व डिव्हाईस दिसतील.