स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी ४० हजार कोटींची तरतूद


नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू सुरु आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे देशभरातील विविध राज्यातील मजुरांनी आपआपल्या घराची वाट धरली आहे. त्या मजुरांना सुरक्षित घरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था केली जात आहे. पण हे मजूर आपल्या राज्यात पोहचल्यानंतर त्यांच्या रोजगारांच्या उद्देशाने केंद्र सरकारने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या मजुरांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती आज सलग पाचव्या दिवशी देखील दिली आहे. देशातील वेगवगेळ्या शहरात काम करणारे मजूर आजच्या स्थितीला घरी जात आहे. विशेष रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या प्रवासाची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या तिकिटाचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकारने उचलला आहे. त्याचबरोबर मजुरांना थेट मदत देखील करण्यात आल्याची माहिती सीतारमन यांनी दिली आहे.

आपआपल्या राज्यात परतणाऱ्या या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण घरी परतल्यानंतर निर्माण होणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून सरकारने यासाठी मनरेगा योजनेकरिता अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Leave a Comment