ऑनलाईन डेटाबेसच्या मदतीने निर्वासित कामगारांना प्रवासात मदत करणार सरकार

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी निघालेल्या कामगारांच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन नॅशनल मायग्रेंट इंफॉर्फेशन सिस्टम (एनएमआयएस) तयार केली आहे. गृहमंत्रालयाने या विषयी सांगितले की, या प्रणालीमुळे कामगारांविषयी राज्यांना एकमेंकाशी जलद संवाद साधण्यास मदत होईल. याद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील करता येईल, ज्याद्वारे कोरोनाची संसर्ग रोखण्यास मदत होईल.

हे पोर्टल केंद्राचे भंडार म्हणून काम करेल. सोबतच राज्य आणि जिल्ह्यांकडून ऑनलाईन माहिती पाठवली जाईल व त्यांच्याकडून माहिती मिळवली जाईल. याद्वारे किती कामगार कोठून कोठे चालले आहेत व किती जण आपल्या राज्यात पोहचले आहेत, याची माहिती राज्यांना मिळेल. कामगारांना ट्रेस करण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी मोबाईल नंबरचा वापर केला जाईल.

Leave a Comment