ड्रामेबाज राहुल गांधींना गरिबांशी काही घेणे देणे नाही – सीतारमन

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना घरी जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 20 स्थलांतरित कामगारांशी जवळपास तासभर चर्चा केली होती. आता यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला असून, त्यांचे कामगारांसाठी बोलणे नाटक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राहुल गांधींना ड्रामेबाज म्हटले आहे. 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजच्या 5व्या टप्प्याची माहिती देताना त्या बोलत होत्या.

सीतारमन म्हणाल्या की,  राहुल गांधींचे स्थलांतरित कामगारांसाठी बोलणे हे एक नाटक आहे. सोबतच सीतारमन यांनी राहुल गांधींना स्थलांतरितांच्या समस्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारसोबत यावे असे म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, मला विरोधी पक्षाला सांगायचे आहे की स्थलांतरितांच्या समस्येवर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. आम्ही सर्व राज्यांसोबत मिळून काम करत आहोत. सोनिया गांधींना यांना सांगू इच्छिते की स्थलांतरितांच्या मुद्यावर जबाबदारीने वागले व बोलले पाहिजे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी रेल्वेचे भाडे भरू शकत नसलेल्या आणि चालत घरी निघालेल्या कामगारांशी चर्चा केली होती. सोबतच या कामगारांना दिल्ली पोलीस ताब्यात घेत असल्याचे म्हटले होते. मात्र दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळले होते.

Leave a Comment