कार कंपनी निसानने आपली नवीन एसयूव्ही किक्स ई-पॉवरला थायलंडमध्ये लाँच केले आहे. निसान किक्स ई-पॉवर एसयूव्ही एस, ई, व्ही आणि व्हीएल या व्हेरिएंटमध्ये येईल. या एसयूव्ही किंमत 8,89,000 थाय बाट (जवळपास 21 लाख रुपये ) आहे. लवकरच भारतात देखील निसान किक्स फेसलिफ्ट मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.
निसानची दमदार एसयूव्ही ‘किक्स ई-पॉवर’ लाँच
थायलंडमध्ये लाँच करण्यात आलेल्या नवीन निसान किक्समध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. अपडेटेड एसयूव्हीमध्ये पियानो ब्लॅक सराउंडसोबत व्ही-मोशन ग्रिल, शार्प एलईडी हेडलॅम्प, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि नवीन ड्युल टोन फ्रंट बंपर देण्यात आला आहे. मागील बाजूला एलईडी हेडलॅम्प, नवीन रियर बंपर आणि रियर स्पॉयलर आहे. एसयूव्ही नवीन डिझाईनच्या 5-स्पोक एलॉय व्हिल्जसोबत येते.

कॅबिनबद्दल सांगायचे तर नवीन किक्स ई-पॉवरमध्ये अपडेटेड गियर-लिव्हर एरिया, अपडेटेड स्टार्ट/स्टॉप बटन आणि अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे. एसयूव्हीमध्ये डॅशबोर्ड, डोर पॅड आणि सीट्ससाठी नवीन कलर-कोडेड लेदर अपहोलस्ट्री देण्यात आली आहे. इंस्ट्रूमेंट कंसोल, स्टेअरिंग व्हिल आणि डॅशबोर्ड लेआउटमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही.
सेफ्टी फीचर्समध्ये फ्रंट एअरबॅग्स, साइड एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक सारखे फीचर्स आहेत. किक्स फेसलिफ्टच्या थायलंड मॉडेलमध्ये सर्वात मोठे अपग्रेड याच्या इंजिनमध्ये करण्यात आले आहे. एसयूव्हीमध्ये कंपनीचे पॉप्युलर ई-पॉवर सीरिज हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आले आहे. यात एक इलेक्ट्रिक मोटर आहे, जी व्हिल्जला पावर ट्रांसफर करते. पॉवर 1.57 kWh लीथियम-आयन बैटरी पॅकद्वारे मिळतो. बॅटरी पॅकला 1.2-लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजन चार्ज करते. याचे हाइब्रिड इंजिन 127bhp कम्बाइंड पॉवर आणि 260Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की थायलँडमध्ये लाँच केलेले मॉडेल 23.4 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देईल.
निसान भारतीय बाजारात देखील लवकरच किक्स एसयूव्हीचे फेसलिफ्ट लाँच करणार आहे. यात 1.3 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. जे 156बीएचपी पॉवर आणि 254एनएम टॉर्क निर्माण करते. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन पर्याय देखील मिळेल. दरम्यान, भारतात विकली जाणारी निसान किक्स, थायलंडमध्ये लाँच झालेल्या किक्स ई-पॉवरपेक्षा वेगळी आहे.