मुंबई पोलिसांचा ‘पाताल लोक’द्वारे फेक न्यूजवर निशाणा

मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाउंट हे मजेशीर ट्विटसाठी ओळखले जाते. मीम्स शेअर करत मुंबई पोलीस अनेक गंभीर गोष्टींबाबत लोकांना मजेदार पद्धतीने जागृक करत असते. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी नुकत्याच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘पाताल लोक’ या सीरिजमधील एका डायलॉग शेअर करत गंभीर विषयावर कटाक्ष टाकला आहे.

मुंबई पोलिसांनी सीरिजमधील लोकप्रिय पात्र हाथी राम चौधरीचा फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा फेक न्यूज पसरवणाऱ्यांना विचारले जाते की – ही महत्त्वाची बातमी कोठे भेटली ? त्यानंतर फोटोद्वारे या प्रश्नाचे उत्तर ‘हे व्हॉट्सअ‍ॅपवर वाचले होते’, असे देण्यात आले आहे.

फेक न्यूज सारख्या गंभीर विषयांवर मुंबई पोलिसांनी मजेशीररित्या साधलेला निशाणा नेटकऱ्यांना देखील आवडला. शेकडो युजर्सनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment