दिव्यांग मुलासाठी या कामगाराने चोरली सायकल, चिठ्ठी ठेऊन मागितली माफी

लॉकडाऊनमुळे लाखो कामगार परराज्यातून चालत आपल्यी घरी निघाले आहेत. जवळ पैसे नाहीत, जेवायला अन्न नाही, अशा स्थिती हे कामगार हजारो किमीचा प्रवास करत आहेत. मात्र या प्रवासात त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. आई-वडील आपल्या लहान मुलांना खांद्यावर घेऊन घरी निघाले आहेत. असाच एक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे.

राजस्थानमधून मोहम्मद इकबाल यांना 250 किमीचा प्रवास करून आपल्या घरी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जायचे होते. मात्र त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. या कामगारासोबत एक दिव्यांग मुलगा देखील होता. त्यामुळे या कामगाराने आपल्या मुलासाठी सायकल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. कामगाराला असे करायचे नव्हते, मात्र सोबत दिव्यांग मुलगा असल्याने शेकडो किमीचा प्रवास करण्यासाठी त्याला हे पाऊल उचलावे लागले. सोबतच त्यांनी सायकलच्या मालकासाठी एक चिठ्ठी देखील सोडली.

मोहम्मद इकबाल यांनी रारह गावातील साहब सिंह यांची सायकल चोरली. सायकल चोरल्यानंतर त्यांनी असे का केले याचे कारण सांगत, आपल्या कृत्याची माफी देखील मागितली.

त्यांनी लिहिले की, मी तुमची सायकल घेऊन जात आहे. शक्य झाल्यास मला माफ करा. कारण माझ्याकडे दुसरे कोणतेही साधन नव्हते. मला एक दिव्यांग मुलगा आहे, जो चालू शकत नाही. त्याच्यासाठी असे करावे लागत आहे. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. तुमचा दोषी एक प्रवासी.

https://twitter.com/NajeebKhanIndi1/status/1261458567820988417

कामगाराचा माफीनामा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment