लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन डेटिंग फसवणुकीमध्ये मोठी वाढ

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात डेटिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या प्लॅटफॉर्मद्वारे फसवणुकीचे प्रकार देखील वाढल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनच्या काळात विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅप ग्लिडन भारतात 10 लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे. तर टिंडर, बम्बल या सारख्या अ‍ॅप्सची लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

डॉ. अँड्रिया पोझ्झा यांच्या नेतृत्वाखालील यूनिव्हर्सिटी ऑफ सिइना आणि स्कॉट यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, काल्पनिक इंटरनेट प्रोफाईलद्वारे हे ठग 6-8 महिने व्यक्तीशी नाते तयार करतात व त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळतात. यामुळे नाते संपुष्टात येणे आणि पैसे जाणे असा दुहेरी धोका असतो. या संदर्भातील रिसर्च जर्नल क्लिनिकल प्रॅक्टिस आणि इपिडेमोलॉजी इन मेंटल हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे.

एकट्या उत्तर अमेरिकेत मागील दशकात 1400 डेटिंग साईट्स सुरू झाल्या आहेत. ब्रिटनमधील 23 टक्के लोक हे ऑनलाईन एकमेंकाना भेटतात, तर 6 टक्के विवाहित जोडपी ही एकमेकांना ऑनलाईन भेटलेली असतात.

संशोधकांनुसार, ऑनलाईन डेटिंग इंडस्ट्रीने नवीन पद्धतीच्या विकृती आणि गुन्ह्याला जन्म दिला आहे. यानुसार, 63 टक्के सोशल मीडिया युजर्स आणि 3 टक्के नागरिक एकदातरी या गुन्ह्याला बळी पडले आहेत. महिला, मध्यम गटातील लोक, अधिक चिंता करणारे, नात्याला रॉमेंटिक समजणे आणि नात्याबद्दल संवेदनशील असणारे फसवणुकीला सर्वाधिक बळी पडतात. हे ठग महागडे गिफ्ट, पैसे मागतात. एका व्यक्तीकडून पैसे मिळाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीबरोबर नाते निर्माण करतात. काही प्रकरणात फोटो देखील मागितले जातात व त्या फोटोंचा ब्लॅगमेल करण्यासाठी वापर केला जातो.

Leave a Comment