संसर्गजन्य रोगाविरूद्ध सरकारची तयारी पूर्ण, ब्लॉक स्तरावर बनवले जाणार लॅब


नवी दिल्ली – 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील घोषणांच्या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य क्षेत्रात मोठी घोषणा केली. अर्थमंत्री म्हणाल्या की, केंद्र सरकारने ग्रामीण पातळीवरील आरोग्याच्या क्षेत्रात देखील वाढ करत आहे.

त्यांनी अशी घोषणा केली की, सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गजन्य ब्लॉक होईल आणि ब्लॉक स्तरावर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सुरू केली जाईल. अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, जिल्हा पातळीवरील रुग्णालये देखील आत्मनिर्भर होतील. त्याचबरोबर लॅब नेटवर्क मजबूत केले जाईल. तसेच आरोग्य आणि वेलनेस सेंटरमध्ये वाढ केली जाईल.

सीतारमन म्हणाल्या की, आरोग्याच्या क्षेत्रात अशी रचना निर्माण करावी, ज्या आरोग्याच्या क्षेत्रासोबतच अशा संकटाकाळात लढा देण्याची क्षमतादेखील त्यांच्यात असली पाहिजे. यासाठी आरोग्य क्षेत्रात सरकारी खर्च वाढविला जाईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
सीतारमन पुढे म्हणाल्या, कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाला 15 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. चाचणी आणि स्लॅव किटसाठी 550 कोटी देण्यात आले आहेत. कोरोनाबरोबर युद्धात लढणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यासाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Comment