आता चक्क काठमांडूवरून दिसत आहे शेकडो किमी अंतरावरील माउंट एव्हरेस्ट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील 50 दिवसांपासून लोक आपआपल्या घरात कैद आहेत. याचा मनुष्याच्या जीवनावर विपरित परिणाम झाला असला तरी पर्यावरण चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत, प्रदुषण कमी झाले आहे. यामुळे भारतातील विविध शहरातून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा दिसत आहे. आता नेपाळच्या काठमांडू व्हॅलीमधून देखील माउंट एव्हरेस्ट दिसत आहे.

The reduction of vehicular emission due to the #COVID19 lockdown has cleaned the air over Nepal and northern India. So…

Posted by Everest Today on Friday, May 15, 2020

काठमांडूपासून माउंट एव्हरेस्ट 200 किमी लांब आहे. मात्र लॉकडाऊनमुळे प्रदुषण एवढे कमी झाले आहे की आता शेकडो किमीवरून माउंट एव्हरेस्ट दिसत आहे. अनेक वर्षानंतर व्हॅलीमधून हे सुंदर दृश्य दिसत आहे.

काठमांडू व्हॅलीतील चोबार येथून अभुषण गौतम यांनी हा फोटो काढला आहे. सोबतच माउंट एव्हरेस्ट ओळखता यावे यासाठी बाणाची खूण देखील केली आहे.  फोटोमध्ये माउंट एव्हरेस्ट इतरांपेक्षा लहान का दिसत आहे ? याचे उत्तर देताना गौतम यांनी सांगितले की, फोटोमध्ये एव्हरेस्ट माउंट कँग नाचुगो आणि माउंट चोबत्सु यांच्या मागे आहे.

माउंट एव्हरेस्टचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment