केंद्र सरकारने जाहिर केलेल्या 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचे पूर्ण तपशील

  • मोदी सरकारने 20 लाख 97 हजार 53 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले.
  • कोरोना संकटात, सरकारने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी पावले उचलली.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणत्या क्षेत्रांतर्गत किती पैसे खर्च केले किंवा वाटप केले हे सांगितले.

सप्लाईचेन दुरुस्त करण्यासाठी मोदी सरकारने 20 लाख 97 हजार 53 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेजच्या शेवटच्या टप्प्यातील माहिती जाहिर केली आणि किती पैसे खर्च केले किंवा वाटप केले याची माहिती दिली. त्यांनी या पॅकेजचे संपूर्ण तपशीलवार हिशोब दिला आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या रकमेपैकी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जुन्या अनुदानासह 1,92,800 कोटी रुपये आहे. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी उचललेल्या उपाय योजनांचा देखील समावेश आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या की, 13 मे 2020 रोजी त्यांनी जाहीर केलेले पॅकेज 5,94,550 कोटी रुपयांचे होते. त्यात एमएसएमई, ईपीएफ, एनबीएफसी, टीडीएस आणि टीसीएस दर कपात इत्यादींचा समावेश होता.

यानंतर 14 मे 2020 रोजी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज 3,10,000 कोटी रुपयांचे होते. त्यावेळी किसान विकास पत्र, स्थलांतरित मजुरांना धान्य, मुद्रा शिशु कर्ज इत्यादींच्या बाबतीत सरकारने मोठ्या घोषणा केल्या.

शुक्रवारी केंद्र सरकारने एकूण 1,50,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली असून यामध्ये हर्बल कल्चर, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना इत्यादी घोषणा देऊन गरिबांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी मदत केली.

शनिवारी आणि रविवारी सरकारने आर्थिक पॅकेजचा चौथा आणि पाचवा टप्पा जाहीर केला. या दोन दिवसात 48,100 कोटींच्या घोषणा करण्यात आल्या.

अर्थमंत्री म्हणाल्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आतापर्यंत लागू केलेल्या 8,01,403 कोटी रुपयांची पावले उचलली आहेत. अशाप्रकारे सरकारने अर्थव्यवस्थेसाठी एकूण 20 लाख 97 हजार 53 कोटी रुपयांचे महापॅकेज जाहीर केले आहे.

Leave a Comment