अखेर चीनचा कबुलीनामा; व्हायरसचे नमुने नष्ट केल्याचे मान्य

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशांनी चीनवर या व्हायरसची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. आता चीनने स्वतः कोरोना व्हायरसचे सुरूवातीचे नमुने नष्ट केल्याचे मान्य केले आहे. काही दिवसांपुर्वी अमेरिकेने देखील चीनवर व्हायरसचे नमुने नष्ट केल्याचा आरोप केला होता.

आजतकच्या वृत्तानुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे सुपरवायझर लीऊ डेंगफेंक यांनी मान्य केले की, 3 जानेवारीला चीन सरकारने आदेश दिला होता की अनाधिकृत लॅबमधून कोरोना व्हायरसचे नमुने नष्ट करावेत. मात्र हे नमुने काही लपवण्याच्या दृष्टिने नष्ट करण्यात आले होते, या आरोपांचे त्यांनी खंडन केले. त्यांनी सांगितले की, लॅबमध्ये बायोलॉजिकल सुरक्षा आणि पुढे जाऊन दुसरी घटना होऊ नये यासाठी व्हायरस नष्ट करण्यास सांगण्यात आले होते.

डेंगफेंग यांनी सांगितले की, अशा नमुन्यांसाठी ते लॅब अनाधिकृत होते व चीनच्या आरोग्य कायद्यांतर्गतच त्यांना नष्ट करण्यात आले. या व्हायरसला संसर्गजन्य घोषित केल्यानंतरच नष्ट करण्यात आले होते.

Leave a Comment