लॉकडाऊन हा तर श्रीमंतांचा खेळ – चेतन भगत

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे ला समाप्त होणार आहे. सरकारने लॉकडाऊन 4.0 देखील घोषित केले आहे. मात्र सरकारच्या लॉकडाऊन वारंवार वाढविण्याचा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. आता यावर प्रसिद्ध लेखक चेतन भगतने प्रतिक्रिया दिली आहे.

चेतन भगतने लॉकडाऊन हा श्रीमंतांचा खेळ असल्याचे म्हणत, सरकारवर निशाणा साधला आहे.

चेतन भगतने ट्विट केले की, लॉकडाऊन श्रीमंतांचा खेळ आहे. श्रीमंत व्यक्ती आजारी पडल्यावर सुट्टी घेऊन महिनाभर घरी राहू शकतो. गरिबाकडे असा पर्याय नाही. अशाच प्रकारे श्रीमंत देश दीर्घकाळ लॉकडाऊन करू शकतात. मात्र गरिब देशांकडे तो पर्याय नाही.

दरम्यान, 18 मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. मात्र नियमात बदल करण्यात येणार आहेत.

Leave a Comment