शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती दिली. मागील चार परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी दिल्या जाणाऱ्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची अर्थमंत्र्यांनी माहिती दिली. सीतारमन यांनी यावेळी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दलची माहिती दिली. प्रत्येक इयत्तेसाठी डीटीएचवर वेगळा चॅनेल तयार करणार असून सध्याच्या घडीला डीटीएचवर असे तीन चॅनल असून त्यात आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. इंटरनेटच्या सुविधेचा ज्या विद्यार्थांकडे अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

ई-कॉन्टेंटची निर्मितीही चॅनलद्वारे होईल. त्याचबरोबर वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. यासाठी पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार असून विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल कार्यक्रम देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. तसेच देशातील अग्रगण्य १०० विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Leave a Comment