लॉकडाऊनमध्ये लाखो निर्वासित कामगार पायी चालत आपल्या घरी निघाले आहेत. या कामगारांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. अशाच कामगारांच्या मदतीसाठी तेलंगानामधील 100 शिक्षक एकत्र आले आहेत.
हे शिक्षक करत आहे हजारो स्थलांतरित कामगारांच्या जेवणाची व्यवस्था
हे शिक्षक निझामबाद येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वरून जाणाऱ्या हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी जेवणाची सोय करत आहेत. या शिक्षकांच्या गटाचे नेतृत्व करणारे शैक्षणिक अधिकारी बाट्टू राजेश्वर यांनी सांगितले की, आम्ही दररोज 700 कामगारांना जेवण देण्याच्या उद्देशाने सुरूवात केली होती. मात्र आता हा आकडा 3 हजारांवर पोहचला आहे. आम्ही जेवण बनविण्यासाठी देखील कर्मचाऱ्यांना ठेवले असून, यासाठी दररोज 20 हजार रुपये खर्च येत आहे. हा सर्व खर्च शिक्षकांनी दिलेल्या निधीतून केला जात आहे.
शिक्षकांच्या या गटाने अनवाणी पायाने चालणाऱ्या कामगारांसाठी चप्पलांची देखील सोय केली आहे. मात्र आता संख्या वाढल्याने त्यांना स्त्रोत कमी पडत आहे.